महाड-पोलादपूर कलाध्यापक संघ : रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक समारंभ संपन्न

महाड-पोलादपूर : रायगड माझा वृत्त 

महाड-पोलादपूर तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक समारंभ नुकताच महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या समारंभास महाड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष वजिरभाई कोंडीवकर, टेमघर च्या श्री छत्रपती विद्यालयाचे सभापती ऍड धनंजय देशमुख, प्रसिद्ध व्यापारी लादुलाल शेठ जैन, महाड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सौ पालकर मॅडम, रायगड जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काटे, जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप चांढवेकर, सहकोषाध्यक्ष प्रशांत निकम तसेच महाड-पोलादपूर अध्यक्ष अनिल पालकर (महाड तालुका स्पर्धा प्रमुख), नित्यानंद पाटील (पोलादपूर तालुका स्पर्धा प्रमुख), उपाध्यक्ष नवीन परमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आईंनकर सर यांनी व प्रस्थाविक दिलीप दिलीप चांढवेकर यांनी केले. स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष जाधव सर यांच्यासह महाड-पोलादपूर तालुका कलाशिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत