महाड : प्रसाद पाटील
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध घाटातील रस्त्याची संरक्षण भिंतीसह रस्त्याचा काही भाग कोसळला आहे. यामुळे वाहतुकीसाठी दोन ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्या संदर्भातील बोर्ड ही रस्त्यात लावले असुन पोलिस कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत. दक्षिण रायगडमध्ये पुणे, भोर, पंढरपुर या भागातुन मोठ्या प्रमाणात भाजा आणि दुध येते, त्याच प्रमाणे पुण्यातुन व्यापारी सामान देखिल मोठ्या प्रमाणत येत असतो. हा घाट बंद झाल्याने स्थानिकांच्या व्यवहार आणि व्यापारावर मोठ्ठा परीणाम होतो.
वरंध घाट रस्त्यावर अनेक वेळा दरड कोसळल्या आहेत. मात्र दरड काढल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. मात्र गेल्या वर्षी पासुन दरडीमुळे घाट रस्त्याला धोका निर्माण होत असुन वाहतुक बंदचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गतवर्षी हा रस्ता साहा महिने बंद होता या वर्षी पुन्हा हा रस्ता बंद झाला आहे. प्रशासनाने या घाट रस्त्याचे कायम स्वरूपी काम करावे अशी मागणी केली जात आहे.आता नागरिकांची ही मागणी शासन मेनी करते का ? हे पहाणे महत्वाचे ठरेल.