महाड येथील जवान प्रथमेश कदम याचा भोपाळ येथील दुर्घटनेतून  मृत्यू

महाड तालुक्यांतील शेवते गावांत आज शासकीय इतमामांत होणार अंत्यविधी

महाड : मयुरी खोपकर

भोपाळ येथे कर्तव्य बजावित असताना विजेचा धक्का बसल्याने , महाडचा जवान प्रथमेश कदम हा गंभीर जखमी झाला  होता मंगळवारी दिल्ली येथे उपचारा दरम्यान त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे.  गुरूवारी सकाळी त्याचा पार्थिव त्याच्या जन्मगाव असणाऱ्या शेवते गांवात आणण्यात येणार असून तेथे हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे. 
प्रथमेश दिलीप कदम वय २६ जन्म २६ मार्च १९९२ मुळ गाव शेवते शिक्षण पदवीधर नाशिक तेथून सैनिकी अॅकेडॅमीतून सैनिक भरती त्याच कुटुंब नाशिक येथे वडीलांच्या नोकरी निमित वास्तव्यास  आहे.  प्रथमेश हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील एक विवाहित मोठी बहिण असा परिवार  आहे. सध्या प्रथमेश भोपाळ येथील भारतीय लष्कराच्या इंजिनिअरिंग विभागात  कार्यरत होता. शनिवारी सकाळी भोपाळ येथे कर्तव्य बजावित असताना विजेचा धक्का बसल्याने तो जखमी झाला होता, अशी माहिती जिल्हा सैनिक कार्यालयाकडून देण्यात आली.  यामध्ये प्रथमेश गंभीर जखमि झाला होता जखमि प्रथमेशला तात्काळ मिलिटरीच्या हेलिकॉप्टरनी दिल्लीच्या मिलीटरी आर .आर. हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
 
प्रथमेशवर दिल्ली येथे उपचार सुरु असतांना मंगळवार दि .१५ मे रोजी दुपारी १२ वाजता त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती समजताच नाशिक येथून त्याचे वडील आई चुलत भाऊ आणि मोठे चुलते दिल्ली येथे दाखल झाले आहेत प्रथमेश याला बुधवारी सांयकाळी  दिल्ली येथे  लष्करी सलामी देण्यात येवून येथून खास लष्करी विमानाने त्याच पार्थिव मुंबई येथे रात्री १ वाजता आणण्यात येणार आहे.
पहाटे मुंबई येथून प्रथमेश याच पार्थिव लष्करी जवान त्याच्या जन्मगाव शेवते महाड येथे घेवून येथील त्या ठिकाणी तेथे आर्मिचे अधिकारी जवान जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा अधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक  आजी माजी आमदार प्रांताधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषद  पंचायत समिती सदस्य सरपंच महाड पोलादपूरमधील ग्रामस्थ संपूर्ण शासकीय इतमामीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येथील प्रथमेश कदम याचे आजोबा पंजोबा चुलते चुलत भाऊ आणि स्वता तो अस त्याच संपूर्ण चौथी पिढी  भारतीय लष्करात सेवा दिली आहे त्याचे वडील नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे प्रथमेश याच्या मृत्यूची बातमी बुधवारी सकाळ पासून सोशल  मिडीयावरून फिरू लागताच सर्वत्र दुः ख वजा हळहळ व्यक्त करण्यात येवून अनेकांनी त्याच्या शेवते गावाकडे धाव घेतली यामध्ये शासकीय अधिकाऱ्याचां समावेश होता.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत