महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी होणार नाही

रायगड माझा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासली आहेत. त्यात त्यांची हत्या नथुराम गोडसे यांनीच केली असून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नाही. त्यामुळे गांधी हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी होणार नाही, असा अहवाल एमिकस क्युरींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.
‘अभिनव भारत’च्या पंकज फडणीस यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. गांधींची हत्या एका ‘अज्ञात’ व्यक्तीने केली होती. त्यानेच गांधींवर चौथी गोळी झाडली होती. मात्र, त्याला कधीच अटक झाली नाही, असा दावा त्यात करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेतली. गांधी हत्याकांडाशी संबंधित कागदपत्रांचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ७ ऑक्टोबर २०१७ रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची एमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणाशी संबंधित अंतिम अहवाल शरण यांनी न्यायालयात सादर केला आहे. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार नाही, असे त्यात म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत