महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, राज्याची केंद्राकडे शिफारस

मुंबई : रायगड माझा वृत्त 

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.मुंबईतील वरळी इथं ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च 2018 मध्ये लोकसभेत ही मागणी केली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली होती.शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 2015 मध्येच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत