मुंबईत MTNLच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १०० जण आडकले

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आज वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या इमारतीला दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी भीषण आग लागली आहे. ९ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी ग्निशामन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीत १०० जण अडकल्याच वृत्त मिळत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हि आग लेवल ४ ची आग असल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने इमारतीतून बाहेर पडण्यासाठीचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. अडकलेल्या व्यक्तींपैकी १५ जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. बचावकार्यात अग्निशामन दलाकडून नवे रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तसेच हि आग एसीच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत