महाबळेश्वर बस अपघात : कसा झाला अपघात सांगतायेत अपघातातून बचावले प्रकाश सावंत!

महाबळेश्वर बस अपघात : कसा झाला अपघात सांगतायेत अपघातातून बचावले प्रकाश सावंत!

पोलादपूर : रायगड माझा वृत्त 

पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात झालाय. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहलीला निघालेली बस या दरीत कोसळून त्यामध्ये 33 जण ठार झालेत. ही बस जवळपास ५०० फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत फक्त प्राध्यापक प्रकाश सावंत देसाई हे सुखरूप वाचले. दरीतून बाहेर येऊन त्यांनी फोन करून अपघाताची माहिती दिली.

काय घडलं नेमकं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला कलंडली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली गेली. बस जेव्हा दरी कोसळत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

आंबेनळी घाटात ही बस जवळपास ५०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत