महाबळेश्वर : सेल्फी काढताना पर्यटक खोल दरीत कोसळला

महाबळेश्वर : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

 

मोबाईलवर बोलत असताना किंवा फोटो काढत असताना सभोवतालचे भान विसरल्याने झालेले अपघात, सेल्फीच्या क्रेझपायी गेलेला जीव या घटना यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. या अपघातानंतरही सर्वांना अजून शहाणपण आलेले नाही. ताजी घटना महाबळेश्वर येथे घडली असून सेल्फी काढताना पर्यटक दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

थंडीचा मोसम सुरू असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. याच दरम्यान पर्य़टनासाठी आलेला एक पर्य़टक लॉडविक पाईंटवर सेल्फी घेत असताना दरीत कोसळला. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून पर्यटकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोसळल्या पर्यटकाबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत