महामंडळातही डावलले, शिवसेना संतप्त; अाता एकही महामंडळ स्वीकारणार नाही

मुंबई : रायगड माझा 

गेल्या चार वर्षांपासून फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला सत्तेत असूनही भाजपकडून वेळाेवेळी दुय्यम वागणूक मिळाली. मंत्रिपदे वाटपातही दुय्यम स्थान देण्यात अाले. अाता महामंडळाच्या वाटपातही शिवसेनेला डावलण्यात अाल्याचे समाेर अाले अाहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने यापुढे एकाही महामंडळाचे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला अाहे.

गेल्या चार वर्षांपासून राज्यातील सर्वच महामंडळांवरील पदांचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राेखले हाेते, मात्र अाता परदेशी जाण्यापूर्वी विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची, तर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची नियुक्ती केली. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदांचीही नावे जाहीर केली.

युतीच्या अलिखित करारात यापैकी काही पदे शिवसेनेच्या वाट्याला जाणे अपेक्षित हाेते, मात्र त्यावर भाजपने परस्पर अापल्याच जवळच्या लाेकांच्या नियुक्त्या केल्याचा शिवसेनेचा अाराेप अाहे. या प्रकारामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी यापुढे शिवसेना एकाही महामंडळावर अापला पदाधिकारी नेमणार नसल्याची घाेषणा केली अाहे. उर्वरित सर्व महामंडळे अाम्ही भाजपला दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळ्यांच्या ऑफर आल्यानंतरच महाआघाडीबाबत बोलेन : उद्धव

भाजपला हरवण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावे, शिवसेनेनेही यात असावे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात आपण बोलू, अशी प्रतिक्रिया सोमवारी दिली. मात्र, ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी गमतीत दिल्याचा खुलासा ठाकरे यांचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी रात्री केला.

प्रधान म्हणाले, पत्रकारांनी ठाकरे यांना पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘असे उभ्याने बोलणे नको नंतर बोलू,’असे म्हटले आणि ते पुढे निघाले. तरी पत्रकारांनी वाट अडवून ‘शरद पवारांची ऑफर आहे,’ असे म्हणत एकच कल्ला केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी गमतीने “सर्वांच्या ऑफर आल्यावर पाहू,’ असे म्हटले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत