महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर, प्रशांत ठाकूर सिडकोच्या अध्यक्षपदी!

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर सिडकोच्या अध्यक्षपदी तर भाजपाच्या माजी रायगड जिल्हाध्यक्षांना  कोकण म्हाडाचे अध्यक्षपद

मुंबई : रायगड माझा  वृत्त 

राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मंत्रिपदासाठी दावेदार असलेल्या अनेकांची महामंडळावर बोळवण करण्यात आली  आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचाही या यादीत समावेश आहे. पनवेलमध्ये भाजपचे जुने नेते बाळासाहेब पाटील यांनाही कोकण म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांनी पनवेल मध्ये दोन शक्तिस्थाने निर्माण करण्यात आली आहेत.

 
 राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची नावे  देखील या यादीत आहेत . त्यामुळे शिवसेना भाजपाला जमहाराष्ट्र करणार अशी ज्यांना अपेक्षा होती त्यांची या निर्णयामुळे निराशा होणार आहे. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.

नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे :

1) हाजी अरफात शेख  अध्यक्ष  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील ,सभापती कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ
4) हाजी एस. हैदर आझम,अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
5) सदाशिव दादासाहेब खाडे,अध्यक्ष पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील,अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
7)  संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार,उपाध्यक्ष  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
8)  आशिष जयस्वाल,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
9) प्रकाश नकुल पाटील,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील,उपाध्यक्ष,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
11) जगदिश भगवान धोडी,उपाध्यक्ष,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
12) उदय सामंत,अध्यक्ष,महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण
13) श्रीमती ज्योती दिपक ठाकरे,अध्यक्ष,महिला आर्थिक विकास महामंडळ
14) विनोद घोसाळकर,सभापती,मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ
15) विजय नाहटा,सभापती,मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
16) रघुनाथ बबनराव कुचिक,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ
17) मधु चव्हाण,अध्यक्ष,मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
18) संदिप जोशी,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ
19)  प्रशांत ठाकूर,अध्यक्ष,शहर व औद्योगिक विकास महामंडळ ( सिडको )
20)  मो. तारिक कुरैशी,अध्यक्ष,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
21)  राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे,अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत