महामार्गावर ट्रक समोरासमोर धडक; दोघे ठार

live photo

जळगाव : रायगड माझा वृत्त

शहराकडून भुसावळकडे सिमेंटच्या गोणी घेवून जात असलेला आणि नागपूरकडून सुरतकडे कोळसा घेवून जाणाऱ्या ट्रकची तरसोद फाट्याजनीक हॉटेल अमर पंजाब येथे समोरासमोर धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्य झाला तर, अन्य तिघे जखमी आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूरकडून सुरतकडे जाणारा आणि जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकचा महामार्गावरील खड्डा चुकविताना समोरासमोर धडक झाली. यात एका ट्रकवरील हमाल पोपट मोहन सोनार (वय48, रा. शाहुनगर) हा जागीच ठार झाला. तर चालक गयास पिंजारी यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात दोन्ही ट्रकवरील तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पावणे आठ वाजता घडली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत