महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; विजय वडेट्टीवारांचे संकेत

नागपूर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. असं मोठं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलय. नागपूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. कोरोना रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. दरम्यान आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील असंही वडेट्टीवार म्हणाले. मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत