महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आळंदी येथे 2 दिवशीय अधिवेशन.

Image result for महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

पनवेल : साहिल रेळेकर

शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी खाजगी शिक्षण संस्था चालक व शिक्षण विभागाचा सहभाग या विषयावर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे शनिवार दिनांक 22 व रविवार 23 डिसेंबर 2018 रोजी 2 दिवशीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजयनवल पाटील यांनी दिली. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन शालेय शिक्षण व उच्चतंत्रण शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. विनोद तावडे यांनी दिले आहे. तसेच 23 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या समारोपाला माजी विधानसभा सभापती आमदार दिलीप वळसे-पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

सदर अधिवेशनात शाळांमध्ये ‘निसर्ग उर्जेचा वापर’ या विषयावर देखील उवापोह होणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मे. उच्च न्यायालयाने खाजगी संस्था चालकांना मुलाखतीचा अधिकार परत प्रदान केले आहेत तसेच वेतनेतर अनुदानाच्या बाबत सुद्धा काही आठवड्यापूर्वी मे. उच्च न्यायालयाने संस्था चालकांना दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमिवर व आळंदी सारख्या पवित्र भूमिवर राजयभरातुन हजारो संस्था चालक उपस्थित राहतील असे ठाम मत महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजयनाना पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुख्याध्यापकांच्या नियुक्तीच्या बाबतीत सुद्धा फक्त जेष्ठत्वांचा विचार न करता गुजरात राज्यासारखे पात्रता परीक्षा घेण्यात यावी अशी जोरदार मागणीही सदर अधिवेशनात होणार असल्याचे समजते.या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी विजय पाटील यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत