महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर आमदार वैभव नाईक यांची निवड

चौके, मालवण : किशोर गावडे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम २११ व महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम २०९ अन्वये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे सभापती यांचेकडून महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्यपदी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

या समितीची मुख्य म्हणजे राज्यातील सार्वजनिक उपक्रमांची प्रतिवृत्ते व लेख तपासणे आणि त्यांची स्वायत्तता आणि कार्यक्षमता यांच्या संदर्भात त्या उपक्रमाचे व्यवहार सुस्थिर व्यापारी तत्त्वावर आणि दूरदृष्टीच्या वाणिज्यिक प्रथांनुसार करण्यात येत आहेत किंवा कसे याचे परिक्षण करणे ही समितीची कामे असणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत