महाराष्‍ट्रात स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा-अमित शाह तर उद्धव म्हणाले, आमचा काही एक मित्र नाही!

मुंबई- रायगड माझा 

विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपाध्यक्ष अमित शाह नाराज झाले आहेत. अ‍मित शाह यांनी रविवारी मुंबईत संबोधित केले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, तयारी आतापासूनच सुरु करा, अशा सूचना शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

अमित शाह यांनी सांगितले की, लोकसभेच्या जागांसाठी लवकरच प्रभारी नियुक्त करण्‍यात येतील. सर्व जागांसाठी आतापासूनच तयारीला लागा, शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र लढले तरी भाजपचेच कमळ फुलले पाहिजे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही नरेंद्र मोदींची स्वप्न पूर्ण करण्‍यासाठी नाही तर आम आदमीच्या स्वप्नांसाठी लढत आहोत. शिवसेना काही एका पक्षाचा मित्र नाही.

एनडीएचा घटक असलेल्या शिवसेनेने अविश्‍वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी आपल्या सदस्यांना व्हिप जारी केला होता. मात्र, नंतर तो मागे घेतला होता. नंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्‍वास ठरावावर झालेल्या चर्चेतही सहभाग घेतला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचेही कौतुक केले होते.

युतीची चिंता सोडा…

अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, त्यांना भाजप-शिवसेना युतीची चिंता करू नये. त्यांना कार्यकर्त्यांना ’23 पॉईंट वर्किंग स्ट्रॅटेजी’च्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्ष मजबुतीसाठी नव्या मतदार जोडण्यास सांगितले आहेत. प्रत्येक केंद्रावर 25 कार्यकर्त्यांना तैनात करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही भूमिका किंवा नीतीला विरोध केला नाही तर देशातील जनतेच्या हितासाठील न‍िर्णय घेतला. विरोधीपक्ष काय करत आहे हे देशातील जनतेने पाहिले आहे. आम्ही सरकारसोबत आहे. परंतु आम्ही तटस्थ राहिलो. आम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या संपर्कात नाही. जे काही केले ते खुलेआम केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत