महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  ‘डेज्’ पर्वणीच, आज पासून येणार प्रेमाला उधाण ; तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण.

खोपोली : समाधान दिसले

Related image

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्साह देणारे विविध ‘डेज्’  सेलिब्रेशनची तयारी खालापूर तालुक्यासह खोपोली शहरामधील महाविद्यालयातील विद्यार्थी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या ‘डेज्’ सेलिब्रेशनबाबत विविध मत प्रवाह असून बहुतांश विद्यार्थ्यांना याबाबत उत्साह असला तरी, काही विद्यार्थ्यांच्या मते ‘डेज्’ सेलिब्रेशन म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून भारतीय संस्कृतीला विसरण्याचा प्रकार असल्याने काहीनी या बाबत नाराजीही व्यक्त करत आहेत. तरी काहीना हे डेज् एक प्रकारची पर्वणी असल्याने हे डेज् आजपासून सुरु झाल्याने तरुणाईमध्ये हे साजरे करण्यासाठी उत्साह असल्याचे पाहायला मिळत असून तरुणाईसाठी हे डेज् एक प्रकारे पर्वणीच ठरत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज पासून प्रेमाला उधाण येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

‘डेज्’ म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये साजरी होणारी एका प्रकारची दिवाळीच जणू. याच दिवसात आपल्या मनात दडलेल्या भावनांना वाट मिळते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे दिवस हे आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस असतात. त्या दिवसांच्या आठवणी पुढील आयुष्यात सतत मनात गोंगावत असल्याने याच कॉलेजच्या दिवसांमध्ये खास आठवणींचे क्षण देणारे दिवस म्हणजे कॉलेजमध्ये साजरे होणारे डेज्. खरं तर कॉलेजचे डेज् म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीवर इंप्रेशन मारण्याची सॉलिड संधी असते. डेज्च्या दिवसात कॉलेज अक्षरशः बहरू लागतात. एरवी लेक्चरला वर्षभर दांडी मारणारे कॉलेज तरुण व तरुणी अचानक उगवत्या ताऱ्या सारखी एक-एक डेज् च्या दिवसात उगवू लागतात. .

महाविद्यालयतील डेज् म्हणजे एक वेगळीच मज्जा. इतर वेळेस लेक्चर्सला एवढी गर्दी दिसत नाही. तेवढी या डेज् च्या काळात पाहायला मिळते. या दिवसांत नवे मित्र-मैत्रिणीही बनतात. या दिवसात विद्यार्थ्यामध्ये नवा उत्साह निर्माण होत आहे. खोपोलीसह खालापूर तालुक्यामधील महाविद्यालयातील विद्यार्थी ‘डेज्’ सेलिब्रेशनची तयारी उत्साहात करीत असल्याने हे डेज् आजपासून सुरू झाल्याने  विद्यार्थ्यांसाठी ‘डेज्’ ची मोठी पर्वणीच बनली असुन या दिवसात कॉलेज कट्टे, गार्डन, हॉटेल्स, कँफे असे विविध ठिकाणी तरुण – तरुणींनी बहरु लागतात. डेज् चा आठवडा सुरू होताच, प्रत्येक जण वेगवेगळे बेत आखत आपल्या प्रिय व्यक्ती सोबत या डेज् चा आनंद उपभोगत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंद पाहायला मिळत आहे. मात्र काही हे डेज् सुनेसुने वाटते, कारण की आपलाला आवडणारा व्यक्ती कोणत्याही कोणत्यातरी कारणाने व वेगवेगळे मत प्रवाह असल्यामुळे मिळू शकत नसल्याने अनेकांना हे डेज् फक्त आठवणीत काढावे लागतात.

आताच्या युगात तरुणाई हे डेज् साजरी करण्यात एक पाऊल पुढे सरसावली असून ही तरुणाई आपल्या देशाची संस्कृती विसरून विदेशातील संस्कृती जोपासत आनंद उपभोगत आहेत. त्यामुळे काही जाणकारांच्या मते ही तरुणाई विदेशातील संस्कृतीचे अनुकरण करत असल्याची भावना व्यक्त होते. मात्र यांचे  तरुणाईने भारतीय संस्कृतीच्या रुढी परंपरा जपणे काळाची गरज आहे,असे मत ही काही जण व्यक्त करीत आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत