‘महा’ वादळ सक्रिय; येत्या ४ दिवसात पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्र News 24 वृत्त

परतीचा मान्सूननंतर अरबी समुद्रात आलेल्या ‘क्यार’ वादळाची तीव्रता कमी होते, तोच ‘महा’ वादळ आकाराला आले. यातून घडलेल्या वातावरणीय बदलांमुळे नोव्हेंबर उजाडला तरी महाराष्ट्रात पाऊस कोसळतोच आहे. ‘महा’ चक्रीवादळ आता गुजरातच्या किनारपट्टीच्यी दिशेने प्रवास करीत असल्याने महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसणार आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या तीव्र चक्रीवादळाचे स्वरूप आता अतितीव्र झाले असून, पुढील २४ तासांत त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने होणार आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यालाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. येत्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणासाठी जोरदार पावसाचे असले, तरी मंगळवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली. मध्य महाराष्ट्रात काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते, दुपारनंतर सातारा, कोल्हापूर, महाबळेश्वर भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. साताऱ्यामध्ये चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत