महिलांची सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 ने केले गजाआड; 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर नवी मुंबई आयुक्तांलयातून अनेक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्त बीपीन कुमार सिंग अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बीजी शेखर पाटील, पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी वेळोवेळी बैठक घेऊन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना दिल्या होत्या. व विशेष पथके तयार केली गेली होती. त्यानुसार संबंधित गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी पोलीस आयुक्तालयात घडलेल्या सोनसाखळी चोरी तपशील गोळा केला होता.

त्यानुसार चोरी करताना वापरलेल्या वाहनांचे प्रकार चोरीचे ठिकाण चोरीच्या वेळा वार वाहनावर बसलेल्या आरोपींचे वर्तन याचे अभ्यासपूर्ण वर्गीकरण केले होते. त्यानुसार कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला त्यानुसार ओडीसा बॉर्डरवर असणारा मुख्य आरोपी तन्वीर उर्फ दीपक व त्याच्या साथीदाराला कलकत्त्याला पळून जात असताना ओडिसा झारखंड पोलिसांच्या मदतीने धावत्या ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2 यांच्याकडे नवी मुंबई परिसरात संबंधित गुन्हेगारांनी केलेले ले के सारखे गुन्हे उघडकीस झाले. यामध्ये तन्वीर शेख(22), अखिल शरीफ खान(25), तस्शरुफ शेख(22), शबनम शब्बीर शेख(25) यांना अटक करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत