महिलांना नेल पॉलिश लावण्यास मनाई ; देवबंदचा फतवा

सहारनपूर : रायगड माझा वृत्त 

Image result for nails with paint

वॅक्सिंग, शेव्हिंगनंतर आता दारुल उलूम देवबंदने महिलांना नेल पॉलिश लावण्यास मनाई केली असून तसा फतवाच त्यांनी काढला आहे. महिलांनी नखांवर नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदी लावावी, असं दारुल उलूमचे मुफ्ती इशरार गौरा यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम महिलांनी नेल पॉलिश लावू नये. नेल पॉलिश लावणं इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे नेल पॉलिश ऐवजी नखांवर मेहंदी लावावी, असं मुफ्ती इशरार गौरा यांनी म्हटलं आहे. देवबंदने यापूर्वीही वादग्रस्त फतवे जारी केलेले आहेत. मुस्लिम महिलांनी मेहंदी लावण्यास विरोध करणारा फतवाही गुरुवारी जारी करण्यात आला होता. तसेच परपुरुषांच्या हातून बांगड्या भरण्यासही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर शरीराला व्हॅक्सिंग लावणं सुद्धा शरीयाच्या विरोधात असल्याचा फतवा देवबंदने काढला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत