महिलांनी एकत्र येऊन उद्योग करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे

पनवेल : नितिन देशमुख  

महिलांनी एकत्र येऊन उद्योग करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी बुधवारी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी समृध्दी उत्सव कार्यक्रमात बचत गटाच्या महिलाना मार्गदर्शन करताना सांगीतले.

पनवेल महापालिकेने बुधवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये बचत गटातील महिलांसाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर समृध्दी उत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल नगरसेविका विद्या गायकवाड , राजश्री वावेकर , उपायुक्त संध्या बावनकुळे आणि बँकचे अधिकारी उपस्थित होते यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी बचत गटाच्या महिलाना मार्गदर्शन करताना महिलाना आज स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता असल्याना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी बचत गटांना फिरता निधिचे वाटप करण्यात आणि आले. स्वयं रोजगारासाठी बँके कडून कर्जाचे वाटप करण्यात आले. कौशल्या विकास प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी बँक अधिकार्‍यानी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. स्टेप ऑन या संस्थेच्या प्रतींनिधींनी ही यावेळी महिलाना मार्गदर्शन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत