महिला दिव्यांगांन कडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

मुंबई : रायगड माझा वृत्त

दिव्यांग सेनेकडून भांडुपमधील शिवाजी तलाव येथे दिव्यांगांचा न्यायासाठी ‘भिख मांगो’ उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारवर दिव्यांगांवरील डावलण्याच्या कृतीवर हल्लाबोल करण्यात आला. ‘भिख मांगो’ उपोषण दिव्यांग सेना मुंबई उपाध्यक्ष रश्मी कदम यांचा पुढाकाराने घेण्यात आला होता. पत्रकारांची बोलतांना रश्मी कदम म्हणाल्या शिवसेना-भाजप दिव्यांगांसाठी केले काय असे प्रश्न केले. या शिवसेना-भाजप सरकार ने महाराष्ट्र मध्ये दिव्यांगांना रोजगार किती दिला ? १ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग पेंशन मध्ये दिव्यांगांना भिख टाकण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा दिव्यांग या भाजप-शिवसेना सरकारवर खूप नाराज आहेत. आज दिव्यांगांना भिख मागण्याची वेळ या शिवसेना -भाजपाचा सरकार ने आणले आणि दिव्यांगांच्या मागण्या बृहन्मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका, नगरपरिषद आणि महाराष्ट्र सरकारने पुर्ण न केल्यास भिख मांगो आंदोलन असेच चालू राहील यांची शिवसेना-भाजप सरकारने नोंद घ्यावी आसे रश्मी कदम यांनी ठणकावून सांगितले. जर २ डिसेंबर २०१८ पर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पुर्ण करा नाहीतर या भाजप-शिवसेना सरकार ला जागे करण्यासाठी दिव्यांग सेने तर्फे बांगड्यांचा आहेर येत्या ३ डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग दिन” निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना भेट देण्यात येईल. त्यास बरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि गावातून महिला दिव्यांगांनाही मी रश्मी कदम स्वःता दिव्यांग असून सर्वांना आव्हान करते की, आपण ही बांगड्यांचा आहेर या सरकार ला पाठवा. दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी, सरचिटणीस रोहन सातार्डेकर यांनी ‘भिख मांगो’ उपोषणला हजेरी लावली. मुंबई अध्यक्ष मोहन गुरव, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज सातोसे, रेहाना कुरेशी ठाणे जिल्हा सरचिटणीस, दिलीप कांबळे, अनिल शिगंणे, वैभव निळेकर, अमित जैस्वाल हे उपोस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत