महिलेचा मृतदेह पोत्यात सापडला

पुणे : रायगड माझा

महिलेचा हात-पाय बांधत मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एस. एम. जोशी पुला खालील नदीपात्रात हा प्रकार घडला आहे. डेक्कन पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. चार ते पाच दिवसांपूर्वीचा हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत