महिलेवर अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

Santosh-Nagare

नाशिक : रायगड माझा वृत्त

पूजा-विधी करून पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करत महिलेवर अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या निफाडच्या भोंदूबाबाला पोलिसांनी आज गजाआड केले. नाशिकच्या सजग महिलेने छत्रपती सेनेच्या मदतीने या प्रकाराचा पर्दाफाश केला. महिलेने दाखविलेल्या धाडसातून हे बिंग फुटले. याप्रकरणी संशयित भोंदूबाबा संतोष वाळीबा नागरे व साथीदार प्रदीप जाधव, योगेश सोनार यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आणखी प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

नाशिकमध्ये राहत असलेल्या महिलेला गेल्या गुरुवारी (ता.10) संशयित प्रदीप जाधवने संपर्क साधत, “माझ्या ओळखीतील एक बाबा पैशांचा पाऊस पाडतात. या पूजेसाठी महिला हवी आहे,’ अशी बतावणी करीत पूजेला बसण्यासाठी संबंधित महिलेला विचारणा करण्यात आली. या प्रकाराची माहिती संबंधित महिलेने छत्रपती सेनेचे कार्यकर्ते तुषार गवळी यांना दिली. या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी योजना आखली. या योजनेप्रमाणे महिलेला निफाड येथे शनिवारी (ता.12) गेल्यावर “पूजेसाठी निर्वस्त्र व्हावे लागेल’, असे भोंदूबाबाने सांगितले. पूजा करताना “जिन’ येऊन शरीरसंबंध करेल व तेव्हा जिनकडे पैश्‍यांची मागणी केल्याने पैशाचा पाऊस पडेल. पुढील दुष्परिणाम टाळण्यासाठी मीही तुझ्याशी शरीरसंबंध ठेवेन, अशा भोंदूबाबा म्हणाला.

पूजेपूर्वी लॉजवर जाऊन गर्भपिशवीतील पाणी काढून ते जिनला दाखवावे लागेल, असे भोंदूबाबाने शनिवारी तिला सांगितले. घाबरलेल्या अवस्थेतील महिलेने छत्रपती सेनेच्या स्वयंसेवकांना संपर्क साधला. त्यांनी निफाड पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर भोंदूबाबासह अन्य दोघा संशयितांना अटक करत महिलेची सुटका केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत