महेश मांजरेकरांची कन्या सई  ‘दबंग 3’ मध्ये सलमानसोबत झळकणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

महेश मांजरेकर यांची धाकटी कन्या सई बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री घेणार आहे. सुपरस्टार सलमान खानसोबत ‘दबंग 3’ मधून सई मांजरेकर मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. ‘दबंग’ च्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या तिसऱ्या आवृत्तीत सलमानसोबत सईची जोडी जमणार आहे.

           

महेश मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी ‘दबंग 3’ मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अश्वमीला अभिनयाची गोडी नसल्याने तिच्याऐवजी धाकट्या बहिणीची वर्णी लागली. ‘दबंग 3’ मध्ये सलमानसोबत फ्लॅशबॅक सीन्समध्ये सई दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सलमानसोबत सईच्या दृश्यांचं चित्रीकरण झाल्याची माहिती आहे. दोघांवर एक गाणंही चित्रित होण्याची शक्यता आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘दबंग 3’ मध्ये सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसेल, तर अरबाज खान मख्खीची भूमिका साकारणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत