मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुचिता पालवणकर विराजमान

मुरूड : अमूलकुमार जैन

मांडला ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सुचिता सुरेश पालवणकर या मांडला ग्राम पंचायतीच्या सरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत तर उपसरपंच पदी राजेश पाटील हे विराजमान झाले आहेत.

मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुचिता पालवणकर विराजमान

मुरूड तालुक्यातील प्रतिष्ठित म्हणून समजल्या जाणाऱ्या मांडला ग्रुप ग्राम पंचायतीच्या थेट सरपंचपदी शिवसेना काँग्रेस आघाडीच्या सुचिता सुरेश पालवणकर ह्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मानसी कदम यांचा अडीचशे हुन अधिक मतांनी पराभव केला होता. ह्या निवडणुकीत सेना काँग्रेसप्रणित आघाडीचे धर्मेंद्र गायकवाड, अनसूया नाईक,अपेक्षा पालवणकर,गीता नागोठकर,सुहासिनी थळे, राजेश पाटील,फौजिया शेख हे सात तर शेतकरी कामगार पक्षाचे दिशा नांदगावकर,बशीर गोरमे दोन सदस्य निवडून आले होते.

सुचिता पालवणकर यांनी आजपासून मांडला ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत आघाडी कडून राजेश पाटील आणि धर्मेंद्र गायकवाड यांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक अधिकारी राजश्री म्हात्रे यांच्याकडे दाखल केला होता. धर्मेंद्र गायकवाड यांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी राजश्री म्हात्रे यांनी जाहीर केले.

या ग्रामपंचायत निवडणुकीत मांडला ग्राम पंचायत हद्दीतील सेनेचे जेष्ठ नेते सुरेश पालवणकर यांनी त्यांच्या सौभाग्यवती सुचिता पालवणकर ह्या सरपंच पदासाठी उभे राहिले असल्याने विरोधक यांनी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विविध प्रकारच्या व्यूहरचना आखल्या होत्या.मात्र ह्या सर्व व्यूहरचना पार करीत त्यांनी विरोधकांना सरपंच पदाचे उमेदवार सुचिता पालवणकर यांच्यासाहित सेना काँग्रेस आघाडीचे सात सदस्य निवडून आणून विरोधक याना चांगलीच चपराक दिली सरपंचपदी सुचिता पालवणकर व उपसरपंच पदी राजेश पाटील हे विराजमान होताच त्यांचे ग्रामपंचायत चे लेखनिक संतोष मोरे आणि पाणी पुरवठा कर्मचारी सतीश घोसाळकर, यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले. तर सेनेचे माजी उप तालुका प्रमुख भगीरथ पाटील यांनी भगवा फेटा आणि भगवी शाल देऊन शुभेच्छा दिल्या.

जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, ,जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ,काकळघर सरपंच साक्षी ठाकूर, मांडला माजी सरपंच शैलेश रातवडकर,माजी प्रभारी सरपंच साक्षी गायकवाड,काँग्रेसचे अजगर दळवी,विनोद पाटील,इकबाल घारे, निसार नाईक,हिदायत उल्ला दळवी,सुरेश पालवणकर ,बोर्ली शाखा प्रमुख भारत मोती, आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत