माघी गणेशोत्सव निमित्ताने महड़ला भक्तांचा महापूर

( खालापूर : मनोज कळमकर )

खालापूर तालुक्यातील अष्टविनायापैकी एक गणपती असलेल्या महड़ मंदिरात गणेश जयंती निमित्ताने रविवारी पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांग लागली होती.माघी गणेशोत्सावानिमित्ताने आठवड़ाभर महड़ मंदिरात किर्तन व भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.गणेश जयंतीच्या दिवशी हभप वासुदेव महाराज बुरसे यांच्या किर्तनानंतर दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटानी बालगणेशाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम पार पड़ला.अनेक वर्षाची प्रथा असलेले नवसाची ओटी घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती.भक्तांसाठी महाप्रसाद आणि खिचड़ीची सोय महड़ देवस्थान संस्थाना तर्फे करण्यात आली होती. दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या भक्तांची गैरसोय होवू नये यासाठी संस्थानाचे सुरक्षारक्षक आणि खालापूर पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.दुपारी चार पर्यंत भाविकांची संख्येने पन्नास हजारचा आकड़ा ओलांड़ला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत