माजी आमदार विजय सावंत यांचे अवैध बांधकाम नगरपंचायतीने तोडले

कणकवली शहरातील बाजारपेठेचे पाणी वाहून जाणा-या गटारात माजी आ. विजय सावंत यांनी केलेले अनधिकृत बांधकाम नगरपंचायतीने तोडून टाकले.

कणकवली:रायगड माझा

 कणकवली शहरातील बाजारपेठेचे पाणी वाहून जाणा-या गटारात माजी आ. विजय सावंत यांनी केलेले अनधिकृत बांधकाम नगरपंचायतीने तोडून टाकले. नगराध्यक्ष समीर नलावडे, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, आरोग्य सभापती अ‍ॅड. विराज भोसले व इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या अवैध बांधकाम प्रकरणी माजी आ. विजय सावंत यांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली शहरातील विद्यानगर भागातून गडनदीपात्रापर्यंत नाला आहे. हा नाला नगरपंचायतीच्या डी.पी.प्लानमध्ये आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या नाल्यामध्ये संरक्षक भिंत बांधण्याचे काम माजी आ. विजय सावंत यांच्याकडून केले जात होते. या संरक्षक भिंतीमुळे विद्यानगर, जळकेवाडीतील पावसाचे पाणी अडून राहण्याचा धोका सामाजिक कार्यकर्ते अजय गांगण व तेथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला होता. यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाल्यातील बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले होते; परंतु बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते.

मागील दोन दिवसांत कणकवली शहर आणि परिसरात धुवाँधार पाऊस झाला. यात जळकेवाडी, विद्यानगर भागातून आलेले सांडपाणी, नाल्यातील संरक्षक भिंतीमुळे अडून राहिले. संजीवनी रुग्णालयाच्या मागील बाजूच्या अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता. संततधार पावसामुळे या भागात तळे साचले होते. त्यामुळे येथील रहिवाशांनी नाल्यातील संरक्षक भिंत तोडून टाकण्याबाबतची तक्रार नगरपंचायतीकडे केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.