माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

तोंडात गोळी मारुन आत्महत्या; कॅन्सरवर मात, नैराश्याने हरवलं

मुंबई : रायगड माझा वृत्त 

एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू राय यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दुर्धर आजाराने त्रस्त झाल्यामुळेच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतं. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरून गेलं आहे.

Image result for Himanshu Roy

फिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. एटीएसमध्येच असताना त्यांना हा आजार झाला होता. त्यामुळे गेली दोन वर्ष ते वैद्यकीय रजेवर गेले होते. अमेरिकेत जाऊन त्यांनी उपचारही घेतले होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. मात्र तरीही त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळेच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असं सांगण्यात येतं. आज दुपारी हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. रॉय यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

रॉय हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हुशार आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात सह पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी अनेक हायप्रोफाइल केसेस हाताळल्या होत्या. पत्रकार जेडे मर्डर केसपासून विंदू दारा सिंगच्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणापर्यंतच्या अनेक केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. विंदू दारा सिंगला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस आणि अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण आदी प्रकरणं सोडविण्यात रॉय यांची मोठी भूमिका होती.

  • 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते…
  • अहमदनगर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली…
  • नाशिकच्या आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त… 
  • 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं…. 
  • सायबर सेलमध्येही प्रमुख जबाबदारी.
  • महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.
  • राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत