माजी कर्णधार राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘अंडर-१९’ क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने काल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या भारतीय क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

या अकादमीत राहुल द्रविड युवा खेळाडूंना, प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणे, सराव करून घेणे, शिवाय खेळाडू, प्रशिक्षक व साहाय्यक खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडणार आहे.राष्ट्रीय महिला व पुरुष संघांसोबतही राहुल द्रविड काम करणार आहे. शिवाय भारत अ, अंडर-१९ व अंडर-२३ वर्षांखालील संघांच्या विकासात द्रविडचा हातभार असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत