माजी मनसे खालापूर अध्यक्ष महेश सोगेना कृष्णकुंजवर आमंञण

खालापूर : मनोज कळमकर 

तङकाफङकी तालुकाध्यक्ष पदावर उचलबांगडी झालेले महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे खालापूर तालुका माजी अध्यक्ष महेश सोगे यांनी रायगङ दौ-यावर असलेल्या राज ठाकरे यांची भेट व्यथा मांङल्यानंतर त्यांना कृष्णकुंजवर भेटण्याचे आमंञण राज यांनी दिले असून तूर्तास तरि   महेश सोगे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा थांबणार आहे.

अवघ्या चार महिन्यापूर्वी महेश सोगे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या खालापूर तालुकाध्यक्ष पदी कृष्णकुंजवरून निवङ करण्यात आली होती.शेतक-यांच्या प्रश्नावर यशस्वी उपोषण ,द्रूतगती मार्गानजीक अनाधिकृत भराव तसेच पोषक आहार दर्जा यावर महेश सोगे यांची आक्रमक भूमिका यामुळे अल्पावधीत सोगे यांचा दबदबा वाढला असला तरि याच बाबी त्याना अङचणीत आणणा-या ठरल्या. सोगे  यांच्या नकळत तालुकाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून त्याना मुक्त करण्यात आले.मनसे रायगङ जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यानी नवीन मनसे खालापूर तालुकाध्यक्ष पदावर सचिन कर्णूक यांचा कृष्णकुंजवरून राज्याभिषेक करून आणला.

महेश सोगे याना पक्षात मानाचे पद दिले जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली असली तरि अपमानास्पद पद्धतीने पद काढल्याने  महेश सोगे आणि त्यांचे समर्थक व्यथित होते.शिवसेनेचे रायगङ जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र थोरवे यांच्या संपर्कात सोगे होते.पक्षातील जे लाॅबीवर नाराज सोगेपक्ष सोङणार असे वाटत असताना रायगङ दौ-यावर असलेल्या राज ठाकरे यांची महेश सोगे यानी समर्थकांसह भेट घेतली व अन्यायाचा पाढा वाचला.त्यामुळे कृष्णकुंजवरून येणारा निर्णय मनसे कि इतर पक्षाच्या हिताचा हे लवकरच कळेल.

शेयर करा

One thought on “माजी मनसे खालापूर अध्यक्ष महेश सोगेना कृष्णकुंजवर आमंञण

  1. महेश सोगे यांना पदावरुन काढल्याने खालापुर तालुक्यात नाही तर संपूर्ण रायगड मधील मनसे कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे,त्यांना काढन्यासाठी कोण सूत्रधार आहेत त्यांना हटवणे गरजेच आहे ,महेश सोगे यांच्या सारखा प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते मिलने पक्षाला शकय नाही मी म न वि से चा सुधागड तालुका अध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत