माजी सैनीक व विद्यार्थ्याचा होणारा गुणगौरव कौतुकाचा : प्रविण कोल्हे

म्हसळा : निकेश कोकचा

गृप ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गोवले या दुर्गम भागातील गावाचे व पंचक्रोषीतील ग्रामस्थ एकाच वेळी माजी सैनीक व गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करतात त्याचवेळी ग्रामस्थांची सांस्कृतीक पातळीची आम्हा सर्वाना जाणीव होत आहे आशा प्रशंसनीय शब्दांत गोवले ग्रामस्थाचे कौतुक म्हसळयाचे स.पो.नी. प्रविण कोल्हे यानी गोवेले येथे माजी सैनीक व विद्यार्थ्याच्या गुण गौरव कार्यकमांत केले.

यावेळी पं.स.चे सभापती राजेश पानवकर , सरपंच श्रीमती दिव्या जाधव, पंचायत समितीचे स्थानिक सदस्य सुजित शिंदे, माजी मुख्याध्यापक सतीश दोशी, सुदाम सावंत, सिताराम कडू, रामदास मोरे ,पो. पा. दिलीप जाधव आणि ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यगांव गोवेले,मानसई, चिखली,वणी, कुंभारवाडा , गौवळ वाडी, बौद्धवाडी, गोवेले खोंडा, आदीवासी वाडी या पंचक्रोषीतील मान्यवर उपस्थित होते.

सुजित शिंदे यानी उपस्थित माजी सैनिकांचे कौतुक करताना , सैनीकांतील राष्ट्र प्रेमाचे सर्वगुण आपल्या सर्वांत वाढले पाहीजे. दहशत वादी व देशद्रोही शक्ती नष्ट होणे गरजेचे आहे ,आयोजकानी विद्यार्थांचा गुण गौरव करुन दिलेली प्रेरणा म्हणजे मातृ, पितृ व गुरुंचे श्रेष्ठत्वाची जाणीव ठेवण्याचा हा संदेश आहे असे सांगितले. या वेळी माजी सैनिक अनंत गंगाराम सावंत, नामदेव गणपत सावंत, लक्ष्मण शिवराम सावंत, गजानन भिकू मोरे, सुभेदार पांडुरंग तुकाराम सावंत, श्रीमती लक्ष्मी सावंत, महानंदा सावंत, सुमती सावंत व विशेषरीत्या क्रिडा नैपुण्य दाखविलेला दिनेश रमेश मेस्त्री व अन्य विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत