माझ्याविरोधात मराठा समाजाला भडकविण्याचे षडयंत्र : पंकजा मुंडे

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मी सदस्य नाही. त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्न नसताना मी बैठकीतून चिडून बाहेर पडली, या पसरविण्यात आलेल्या बातम्या या हा माझ्या विरुद्ध मराठा समाजाला भडकविण्याचे षडयंत्र आहे, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

आज सकाळी मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होती. ज्या कक्षात ही बैठक सुरू होती; तेथे पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. मात्र त्या काही वेळातच बाहेर पडल्याने त्यावर वृत्तवाहिन्यावर ब्रेकिंग न्यूज झळकल्या. त्यावर खुलासा करताना आपण ज्या समितीची सदस्य नाही त्या बैठकीला थांबणे अपेक्षितच नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच मांडली आहे. सर्वांचीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून चुकीच्या बातम्या पसरवून माझ्याविरोधात मराठा समाजाला भडकविण्याचे षडयंत्र आहे, असे सांगितले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत