माझ्यासाठी उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम-अर्जुन खोतकर

Arjun Khotkar

जालना : रायगड माझा वृत्त

जालन्यातील लोकसभेच्या जागेबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु असताना आज (सोमवार) रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख या भाजप नेत्यांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच माझ्याबाबत अंतिम निर्णय घेतील, माझ्यासाठी उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम असेल, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली. आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते, आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुखांनी दिला.

दानवे म्हणाले, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख येथे आले होतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठविले होते. आम्ही त्यांना भेटलो, आता त्यांच्या बाजूने आणि आमच्या बाजूने कोणताही वाद शिल्लक राहिलेला नाही. आमच्या चेहऱ्यावर हसू आहे.

खोतकर म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सुभाष देशमुख यांना माझ्याकडे चर्चेसाठी पाठविले. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने या विषयावर चर्चा केली पाहिजे. माझे म्हणणे मी स्पष्ट केले आहे. त्यांनी माझी आणि दानवेंची बाजू ऐकून घेतली. मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे की चर्चेला या. त्यांनी मी स्पष्ट सांगितले आहे, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे माझ्याबाबत निर्णय घेतील. मी कधीच म्हटलेले नाही मी मैदान सोडलेले आहे. उद्धव ठाकरेंच्या कोर्टातच अंतिम निर्णय होईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत