‘माझ्या नव-याची बायको’मधून शनायाची एक्झिट!

मुंबई : रायगड माझा 

‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावते आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत आहे. शनाया या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावतो आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया भावते आहे.मात्र आता शनयाच्या फॅन्ससाठी एक निराश करणारी बातमी आहे. शनाया हिची या मालिकेतून एक्झिट होणार आहे.

होय, लवकरच शनाया ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेला अलविदा करणार आहे. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला जाणार आहे.शनाया या मालिकेचे पुढील काही भागाचे शूटिंग करणार आहे. रसिका सुनिलकडून यावर काही स्पष्टीकरण आले नसले तरीही नवीन शनाया कोण असणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. इतकेच नाहीतर शनाया हे पात्रच मालिकेतून काढले जाणार अशाही चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे ही मालिका संपणार असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे.

सध्या ‘ग्रहण’ आणि ‘तुझं माझं ब्रेक अप’ या दोन मालिका संपणार असल्यामुळे यापाठोपाठ माझ्या नव-याची बायको ही मालिकाही संपणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शनायाच्या एक्झिटमागे हे ही एक कारण असल्याच्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आता खरी रंगात आली आहे.

राधिका गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम आता कोर्टात चांगलाच रंगत आहे. जवळजवळ केस राधिकाच्या बाजूने झुकत असताना पण गुरु आजारी पडल्याचं खोटं नाटक करून कोर्टाची पुढची तारीख घेतो. आईला त्याची काळजी आहे हे तो चांगलाच जाणून आहे आणि त्यामुळे कपटी, खोटा गुरुनाथ अजूनही हार मनात नसून आईचे मन आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आईच्या मदतीवर गुरु ही केस जिंकणार का? कि तोंडावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.त्याचबरोबर गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून ते त्याला धारेवर धरतात.

या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाई करण्याची चेतावनी देतात. मग गुरु खरंच राजीनामा देणार का? आणि दिला तर मग शनाया गुरुसोबत राहणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत