माणगांव तालुका पुन्हा हादरला, तीन दिवसांत दुसरी हत्या!

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी केली हत्या!

माणगाव : प्रवीण गोरेगावकर 

माणगांव तालुक्यातील वावे येथील एका आठ वर्षाच्या बालिकेची हत्त्या झाल्याच्या घटना ताजी असतानाच तालुक्यातीलच रवाळजे येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी पन्नास वर्षाच्या परिचारीकेची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

माणगांव तालुक्यातील रवाळजे येथील पन्नास वर्षीय अरुणा विठोबा उभारे पाली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका म्हणून काम करीत आहे. रवाळजे येथील त्यांच्या त्या एकट्याच रहात होत्या. मंगळवारी 29 मेला रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी चोरीच्या उद्देशाने बाथरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला आणि अरुणा उभारे हिचे हात बांधून गळा घोटत तिची हत्या केली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी अरुणा उभारे यांची हत्या करून त्यांच्या घरातील दोन लाखाचे सोने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली. सकाळी शेजाऱ्यांना अरुणा उभारे अजून बाहेर का आल्या नाहीत का उठल्या नाही असा संशय आल्याने त्यांनी त्यांना आवाज दिला. घरातून काहीच प्रतिसाद येत नसल्याने काहींनी खिडकीतून आत डोकावले तेंव्हा अरुणा उभारे पलंगावर उजव्या कुशीवर झोपलेल्या असून त्यांचे हात बांधलेले व त्यांची जीभ बाहेर आलेली दिसली.

या घटनेची माहिती कळताच माणगाव पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. माणगांव तालुक्यात एकाच आठवड्यात हि दुसरी घटना घडल्यामुळे माणगांव तालुक्यात नागरीकांतून भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांसमोर या गुन्ह्यांचे तपास करणे आव्हानात्मक असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत