माणगांव दुय्यम निबंधकांची मनमानी पक्षपातीपणा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव येथील दुय्यम निबंधक हे विविध कारणांनी दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. कार्यालयात येणाऱ्या पक्षकाराला विनाकारण तांत्रिक त्रास  देत जाणिवपूर्वक दस्तनोंदणीला वेळ लावत असल्यामुळे माणगांवमधील वकील संतप्त झाले असून नागरीकांतुन कमालीचा संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच माणगांव तालुका बार असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत माणगांव दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करीत माणगांव दुय्यम निबंधक वकिलांना नाहक त्रास देत असून फक्त दलालांनाच जवळ  करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. माणगांव दुय्यम निबंधकाविरुध्द तडकाफडकी कारवाईची मागणी लावून धरीत त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणीही लेखी तक्रारीद्वारे सबंधित सर्व यंत्रणांजवल केली आहे.

 

माणगांव येथील दुय्यम निबंधक एम.डी. सुर्यवंशी यांच्याकडून बार असोसिएशनचे वकीलांना विविध दस्त्यातील त्रुटी काढीत त्रास दिला जात आहे. त्याचबरोबर अनेक वकील दस्तनोंदणीकरीता माणगांव येथील सब रजिस्ट्रार ऑफीसमध्ये गेले असता सबरजिस्ट्रार माणगांव नोंदणीस दिलेल्या दस्तात कायदेशीर कोणतीही त्रुटी नसतांना जाणिवपूर्क खोट्या तांत्रिक त्रुटी काढण्याचे प्रकार घडत आहेत. या त्रुटीबाबत वकीलांनी विचारणा केली असता सबरजिस्ट्रार उडवाउडवीची उत्तरे देतात. माणगांव दुय्य्म निबंधक केवळ पक्षकाराकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्याकरीताच त्रुटी काढतात असा गंभीर आरोप माणगांव बार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष महेंद्र मानकर, सचिव सआद जलगांवकर यांनी लेखी तक्रारीने केली आहे.

या तक्रारींची लेखी प्रत इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, पुणे, मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी माणगांव त्याचबरोबर माणगांव तहसिलदार यांना दिली आहे.  या तक्रारीत म्हटले आहे की, दस्त नोंदणी झाल्यानंतर पक्षकारास नोंदणीफी घेतेवेली वकीलांचे अपरोक्ष भरमसाठ फि ची मागणी करीत असलेबाबत वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तसेच वकीलांना एकेरी नावाने अरे तुरेची भाषा अधिकाऱ्याकडून वापरली जात आहे. अशा वागण्यामुळे वकील मंडळींना पक्षकारासमोर अपमानित केले जाते.

त्याचबरोबर या निवेदनात दस्त दाखल केल्यानंतर त्यात कायदेशीर कोणतीही त्रुटी नसतांना नसलेल्या त्रुटी मुद्दामहुन उपस्थित करून पक्षकारांना त्रास दिला जातो व सादर केलेल्या दस्त्याच्या मसुद्यात विनाकारण फेरबदल करण्याची जबरदस्ती केली जाते. त्यामुळे अगोदर दाखल केलेले दस्तांची सायंकाळी नोंदणी होते तर मागाहून दाखल केलेल्या दस्ताची अगोदर नोंदणी केली जाते.. तसेच डि.एम.आय.सी.करिता संपादीत झालेल्या क्षेत्राचा 7/12 उतारा मुल्यांकनाकरीता दिला गेल्यास त्या सातबाऱ्याची अवाजवी स्टँपड्युटी  सांगुन ती कमी करून देण्याकरीता वाचवण्यात येणाऱ्या स्टँम्पड्युटीच्या 30 टक्के रक्कमेची मागणी केली जाते असाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदरची बाब ही कायदेशीर नाही. तसेच दस्तामध्ये अडचण निर्माण करून वेगवेगळ्या मार्गाने भरमसाठ पैसे उकळले जातात. तसेच प्रत्येक दस्ताच्या नोंदणी प्रत्येकी 1000 रुपयांची अवैध मागणी सबरजिस्ट्रार यांच्याकडून केली जाते असा आरोपही त्यांनी केला. शासनाने माणगांव सबरजिस्ट्रारची खातेनिहाय चौकशी करीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

माणगांव दुय्यम निबंधक एम.डी. सुर्यवंशी यांच्याकडे गुरुवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत