( माणगांव – प्रवीण गोरेगांवकर)
रायगड जिल्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या माणगांव तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी गोरेगांव पं. स. गणातून निवडून आलेले शिवसेनेचे राजेश पानवकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे या निवडणूकीचे पिठासीन अधिकारी तथा माणगांव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी जाहीर केले. राजेश पानावकरयांच्या निवडीनंतर त्यांचे माजी सभापती महेंद्र तेटगुरे, शिवसेनेचे सर्व पं. स. सदस्य, कार्यकर्ते व अधिकारी वर्गांनी अभिनंदन केले.
माणगांव पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक 14 मार्च 2017 रोजी झाली होती. या निवडणूकीत शिवसेनेने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला अनपेक्षित धक्का देत 8 पैकी 5 जागांवर विजय संपादित करीत तब्बल 15 वर्षानी पंचायत समितीवर भगवा फडकवला. हि निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलीहोती. शिवसेनेने या निवडणूकीत राजीव साबळे यांच्या नेतृत्वाखाली व्युहरचना करीत राष्ट्रवादी कॉग्रेसला पराभूत केले होते. गोरेगांव जिल्हापरिषद मतदार संघात लोणेरे पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेनेचे महेंद्र तेटगुरे हे सुरुवातीच्या दहा महिने कालावधीसाठी सभापती पदावर विराजमान झाले. तेटगुरे यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींनीठरवून दिल्याप्रमामे 2 जानेवारी 2018 रोजी दिला. या रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018 रोजी निवडणूक घेण्यात आली.
दुपारी 2 वा. सर्व पंचायत समिती सदस्यांची विशेष सभा पिठासन अधिकारी बाळासाहेब तिडके यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाली. या निवडणूकीकरिता राजेश मारुती पानवकर यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याने सभापती ते बिनविरोध निवडून आल्याचे पिठासन अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी जाहीर केले.राजेश पानवकर यांची माणगांव पं. स. सभापती पदी बिनविरोध निवड जाहीर झाल्यावर उपस्थित शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्याही सर्व सदस्यांनी त्यांचे अभिंनदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते अॅड. राजीव साबळे, माजी तालुकाप्रमुख अरुण चाळके, सुधीर पवार, मंगेश कदम, प्रसाद गुरव, नथुराम करकरे, मिलींद फोंडके, अॅड. महेंद्र मानकर, राजू शिर्के, प्रताप घोसाळकर, विभाग प्रमुख मधुकर नाडकर, माजी उपसभापती रामभाऊ म्हस्कर, माजी उपसभापती गजानन अधिकारी, नगरसेवक नितीन बामगुडे, सचिन बोबले, युवा नेते सुमित काळे, माणगांव शहर प्रमुख अजित तार्लेकर, महेंद्र दळवी, रविंद्र भिकु मोरे, वामन बैकर, नथुरामबामणोलकर, जगदीश दोशी, प्रभाकर ढेपे, दुर्वास म्हशेलकर, सचिन शिगवण, नांदवी ग्रा.पं. सदस्य राजेंद्र बिरवाडकर, अॅड. राजेश लिमजे, पंढरी शेडगे, जगदीश भोकरे आदिंसह तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी व कुरवडे ग्रामस्थांनी सभापती पानवकर यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सभापती पानवकर यांची माणगांव, गोरेगांव शहरात व त्यांच्या कुरवडे गांवी वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठया संख्येने शिवसैनिक सामिल झाले होते.