माणसाने धर्म तयार केला आहे -सुजाता तानवडे

कर्जत : संजय गायकवाड 

ईश्वर किंवा अल्लाने नव्हे तर माणसाने धर्म तयार केला आहे असे प्रतिपादन कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी इफ्तार पार्टीच्या वेळी केले.
           त्यापुढे म्हणाल्या आपण पोलीस ठाण्यात कधीही या तेथे तुम्हाला भीती वाटली नाही पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला सेफ वाटले पाहिजे. पोलीस ठाण्यात आल्यावर न्याय मिळेल आणि न्याय मिळाला नाही तरी कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. न्याय दानाचे काम हे न्यायालयाचे आहे मुस्लिम समाजाने नेहमीच पोलीस ठाण्याला सहकार्य केले आहे असे सांगून मुस्लिम समाजाला पोलीस ठाण्याच्या वतीने ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
          कर्जत शहरात असलेल्या सुन्नी जामा मस्जिद मध्ये काल. दि.15 जून रोजी ईदच्या पूर्व संध्येला कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे, पोलीस नाईक प्रशांत देशमुख, पोलीस नाईक सुजित माळी, पोलीस नाईक जयवंत कोळी, मुस्लीम समाज अध्यक्ष हुसेन मुल्ला, मशिदीचे मौलाना हाफिज तालिब रजा, बांगी हाफिज आदी उपस्थित होते.
         मुस्लीम समाज अध्यक्ष हुसेन मुल्ला यांनी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे व त्यांच्या सहकारी यांचे स्वागत केले. तर पोलीस निरीक्षक तानवडे यांनी हुसेन मुल्ला यांचे पुपगुच्छ देऊन स्वागत केले. नदीम खान यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हमीद खैराट यांनी केले.
          या प्रसंगी रहीम शेख, समीर मुल्ला, रफिक मुल्ला, सरताज खान, सैदू शेख, अरमान खान आदी सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत