माणुसकीला काळिमा फासणारी घटना ; पेन्शनसाठी आईचा मृतदेह ठेवल पाच महिने लपवून

वाराणसी- रायगड माझा वृत्त

उत्तर प्रदेशच्या वाराणसीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलांनी त्यांच्या आईचा मृतदेह पाच महिने लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या पेन्शनसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.

वाराणसीतील भेलूपूरमधील कबीर नगर कॉलनीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. या भागातील सोनिका पार्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पाच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला सरकारी नोकरीतून निवृत्त झाली होती आणि तिला निवृत्ती वेतन मिळत होतं. आईचा मृत्यू झाल्याचं सर्वांना समजल्यास, प्रशासनाकडे तशी नोंद झाल्यास निवृत्ती वेतन बंद होईल, यासाठी मुलांनी आईचा मृतदेह तब्बल पाच महिने लपवून ठेवला. आज (बुधवारी) ही घटना समोर आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी महिलेच्या मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत