मातंग समाजाच्या आरक्षणासाठी बीडमध्ये तरूणाने घेतली जलसमाधी

बीड : रायगड माझा ऑनलाईन 

The youth suicide for the demand of independent reservation for the Matang community in beed | बीडमध्ये मातंग समाजाच्या आरक्षणासाठी तरूणाने घेतली जलसमाधी

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव येथील ३५ वर्षीय तरूणाने जलसमाधी घेतली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

संजय ज्ञानोबा ताकतोडे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारी रात्री तो घरातून निघून गेला होता. मंगळवारी सकाळी बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या भिंतीवर त्याची बॅग आणि मोबाईल सापडला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेतली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सध्या मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून नातेवाईकांनी गर्दी केली आहे. येथील वातावरण शांत असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी संजयने स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये त्याने आरक्षणासह विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. जवळपास  अडीच मिनीटांचा हा व्हिडीओ असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत