माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबार

बदलापूर : रायगड माझा वृत्त

शिवसेना प्रणीत माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बदलापूरच्या सानेवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारात जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. पण यात हल्लेकोरांनी एक गोळी हवेत चालवली आणि दुसर्‍यांना जगदीश यांच्यावर पिस्तूल रोखताच पिस्तूल लॉक झाल्याने जगदीश यांचा जीव वाचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गोळीबाराची घटना घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. गोळीबार होताच स्थानिकांच्या मदतीने जगदीश यांच्या जवळ धाव घेतली. सुदैवाने या गोळीबारात जगदीश हे सुखरूप आहेत.
दरम्यान, दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी जगदीश यांच्यावर गोळीबार केला असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करत आहे.

भर रस्त्यात जगदीश यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तर पोलीस या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींची त्याचबरोबर जगदीश यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे हल्लेखोर नेमके कोण होते, हे कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं आहे का याचा शोध आता पोलीस घेतायंत. यासाठी पोलीस परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीचाही वापर करणार आहेत.

भर रस्त्यात माथाडी कामगारावर असा गोळीबार झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पण सुदैवाने जगदीश कुडेकर हे या हल्ल्यातून बचावले आहेत. त्यामुळे पोलीस जगदीश यांचीही या प्रकरणात चौकशी करणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत