माथेरानचे सुपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती उत्साहात साजरी

माथेरान : दिनेश सुतार (प्रतिनिधी)

सन् १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे आजाद दस्ता या क्रांतीकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल व त्यांचे सहकारी वीर हीराजी पाटील यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगीरीतुन मुक्त करण्यासाठी २ जाने १९४३ च्या पहाटे ६:०२ वा. ब्रिटीशांशी लढताना वीर मरण पत्करले या रक्तरंजीत लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची आज दि. १ डीसें रोजी १०८ वी जयंती मोठ्या उत्साहात माथेरान मध्ये संपन्न झाली. माथेरानचे सुपुत्र वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी समस्त माथेरानकरांनी हुतात्मा स्मारक येथुन सकाळी ८ वाजता शहरातुन मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्म स्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

यावेळी हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवालांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्य कार्यक्रमाची सुरवात करताना माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलनासह शहरातून मशाल फेरी काढण्यात आली.तर हुतात्म्यांच्या नाम फलकास कोतवालांच्या सुनबाई मेघा कोतवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कोतवालांच्या निवास स्थानी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर माधवजी उद्यानातील कोतवालांच्या अर्ध पुतळ्यास वीर भाई कोतवाल ब्रिगेडचे अध्यक्ष रोहिदास क्षिरसागर तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा वीर भाई कोतवाल विचारमंचाच्या कार्यकर्त्यांनी देखील अभिवादन करत माधवजी उद्यानात वीर भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी तर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास माथेरान नागरिक सहकारी पतसंस्थेचे संचालक विजय कदम यांच्या हस्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर कार्यक्रमावेळी भविष्यात तरुण पिढीला वीर भाई कोतवालांचे देशाप्रती केलेले महान कार्य व त्यांचे बलिदान प्रेरणादायी रहावे यासाठी स्थानिक प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या पाठ्यपुस्तक मंडळाकडे वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचा धडा इंग्रजी व मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असावा आशा स्वरूपाच्या विविध मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी कर्जतचे ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, वन संरक्षण समितीचे अध्यक्ष योगेश जाधव माथेरान नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक अवधूत येरफुल्ले, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे बिलाल महाबळे तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि बहुसंख्य नागरीक उपस्थितीत होते.

शेयर करा

One thought on “माथेरानचे सुपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत