माथेरानचे सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज !

माथेरान : मुकुंद रांजाणे

माथेरानचे नैसर्गिकरित्या लाभलेले आल्हाददायक सौंदर्य कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांचे सुयोग्य पद्धतीने संवर्धन केल्यास पर्यटनाला वाव मिळून व्यवसायिक दृष्ट्या सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे असे प्रतिपादन विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी केले. दि.९ ऑगस्ट या क्रांती दिनी येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विद्यमान विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष आदित्य भिलारे, महिला आघाडी प्रमुख मंदिरा दळवी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला येथील हुतात्मा स्मारक भागात एकूण ७५ विविध प्रकारची फळा फुलांची रोपे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.
श्रीराम मंदिर परिसरात पन्नास रोपे लावली आहेत तर  पॉईंटच्या ठिकाणी घोड्यांच्या चावण्यामुळे तसेच मलमूत्रामुळे अनेक झाडे मरण पावली आहेत.त्यासाठी प्रमुख पॉईंट असलेला रामबाग पॉईंट येथे दोनशे पेक्षाही अधिक रोपे लावण्यात आली आहेत.एकूण चारशे रोपे काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी लावण्यात आलेली आहेत.तर या लावलेल्या रोपांना राजाश्रय मिळाल्याशिवाय त्यांची वाढ आणि जतन होऊ शकत नाही यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे. आम्ही सलग पाच वर्षे वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेत असून वखारी नाका तसेच अलेक्झांडर पॉईंट भागात अनेक झाडे जगलेली आहेत. असे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर यांनी स्पष्ट केले.
तर वृक्षारोपण कार्यक्रम हा केवळ एकाच पक्षाच्या वतीने करण्यात येत नसून यासाठी सर्व पक्षीय मंडळी सोबतच काम करीत आहेत हे पाहून समाधान वाटत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी नमूद केले. माजी नगराध्यक्ष अजय सावंत, नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी सुद्धा आपले अनमोल विचार या निमित्ताने प्रकट करून वृक्षारोपण महत्व पटवून दिले.
यावेळी गावातील विविध पक्षाचे अध्यक्ष, सामाजिक संस्थेचे प्रमुख उपस्थित होते. चर्मकार समाजाचे अध्यक्ष हेमंत पवार, धनगर समाजाचे कार्यतत्पर अध्यक्ष राकेश कोकळे, मुस्लिम समाज अध्यक्ष नासिर शारवान, शेकापचे अध्यक्ष शफीक शेख, नगरसेविका रुपाली आखाडे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, माजी नगरसेवक दयानंद डोईफोडे,ज्ञानेश्वर बागडे, नरेश काळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना कांकरिया, शिक्षिका कल्पना पाटील,मराठा समाज अध्यक्ष कुलदीप जाधव, भास्करराव शिंदे, गिरीष पवार, सुभाष रांजाणे,वनखात्याचे वनपाल डी.ए.निरगुडा,वनरक्षक डी.डी. मोरे,वनपाल दिलिप पाटील ,बबलु शिंगाडे उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत