माथेरानच्या एसी कोचने केली 78 हजारांची कमाई

नेरळ : रायगड माझा वृत्त

माथेरानच्या राणीला एसी कोच जोडण्यात आल्यानंतर तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. नेरळ ते माथेरान अशा सहा थेट फेऱ्यांपैकी अप आणि डाऊन अशा दोन फेऱ्यांना एसी कोच जोडण्यात आला आहे. पहिल्या तीन दिवसांत मध्य रेल्वेला एसी कोचपासून 30 हजारांची कमाई झाली होती. 8 ते 18 डिसेंबर या अकरा दिवसांत 78 हजारांची कमाई मध्य रेल्वेला झाली आहे.

शनिवार 8 डिसेंबरपासून नेरळ ते माथेरान अशा थेट सेवेसाठी एक एसी डबा जोडण्यात आला असून त्याच्या दररोज एक अप आणि डाऊन अशा दोन फेऱ्या होत आहेत. 16 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसी डब्यासाठी एका आसनामागे 415 रुपये शुल्क आकारले जात आहे. या ट्रेनच्या दोन्ही फेऱ्यांना शनिवार व रविवारी चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेरळ ते माथेरान प्रवासाची 140 तिकिटे विकली गेली. त्यातून 58,100 रुपये तर माथेरान ते नेरळ परतीच्या प्रवासाची 48 तिकिटे विकली गेली असून त्यातून 19 हजार 920 रुपयांची कमाई झाली आहे. 8 ते 18 डिसेंबरपर्यंत एसी कोचमुळे एकूण 78,020 रुपयांची कमाई झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत