माथेरानच्या डोंगरातील आदिवासी लोक रस्त्याच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी रस्ता रोको करणार

कर्जत : अजय गायकवाड

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या 12 आदिवासी वाड्या रस्त्यापासून वंचित आहेत.दळी जमिनीवर 100 हुन अधिक वर्षे वस्ती करून राहत असलेल्या या आदिवासी लोकांना वन विभाग पक्का रस्ता करून देत नाही.दरम्यान,वन विभाग रस्ता करून देत नसल्याने श्रमदान करून आपली पायवाट शोधणारे माथेरानच्या डोंगरातोल आदिवासी हे पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2021 रोजी नेरळ-माथेरान घाटरस्त्यात रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.

देश पारतंत्र्यात असताना माथेरानच्या डोंगरात आदिवासी लोक वस्ती करून राहत आहेत.या आदिवासी वाड्यांचे वयोमान यापेक्षा कित्येक पट कमी वयोमान वन विभागाचे आहे.तरी देखील वन विभाग नेरळ-माथेरान घटरस्त्यातील जुमापट्टी येथील धनगरवाडा पासून किरवली पर्यन्त 12 आदिवासी वाड्यांची वस्ती पूर्वापार पासून आहे.वन कायदा अस्तित्वात आल्यानंतर या सर्व जमिनीवर वन विभागाने निर्बंध लावले आणि त्या कायद्याचा आधार घेऊन वन विभाग पक्के रस्ते करून देत नाही.10 वर्षांपूर्वी येथील आदिवासी लोकांनी श्रमदान करून पायवाट तयार केली आणि पावसाळ्यात वाहून जाणारी ही पायवाट श्रमदान करून येथील आदिवासी नव्याने तयार करीत असतात.पावसाळा संपल्यानंतर येथील आदिवासी लोक श्रमदान करतात आणि रस्ता बनवतात.मात्र यावर्षी च्या मुसळधार पावसात श्रमदान करून तयार केलेले रस्ते आणि लहान पूल वाहून गेले आहेत.त्यामुळे आदिवासी लोकांचे रस्ते बंद पडले आहेत.त्याचा परिणाम या आदिवासी वाड्यातील आजारी व्यक्तींना कापडी डोली करून किमान चार पाच किलोमीटरचे अंतर पार करत नेरळ माथेरान घाटात दरमजल करीत यावे लागते.

त्यामुळे या भागातील बेकरेवाडी,आसलवाडी,मण्याचा माळ, धामणदांड,सागाची वाडी,चिंचवाडी येथील आदिवासी लोकांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पक्क्या रस्त्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.त्याचवेळी रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी यांना निवेदन देऊन केली.त्यावेळी आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक आदिवासी जैतू पारधी, गणेश पारधी, रमेश सांबरी, पांडू सांबरी,  बाळू सांबरी, चंद्रकांत सांबरी, मनोज शिंगाडे यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत