माथेरानच्या दरीत सेल्फी काढताना महिला कोसळली दरीत, सेल्फी बेतली जीवावर! महिलेचा शोध सुरू

माथेरान : रायगड माझा वृत्त

पर्यटनस्थळ माथेरान येथे फिरावयास आलेली चौहान कुटुंबातील महिला फोटो काढताना खोल दरीत कोसळली.

येथील लुईसा पॉईंट वर संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली.महिलेचे नाव सरिता राममहेश चौहान वय 35 वर्षे असून चौहान परिवार दक्षिण जुनी दिल्ली येथून माथेरान फिरावयास आले होते.एक मुलगी आणि मुलगा व मेहुणी आणि हे दोघे असा 5 जणांचा परिवार माथेरान फिरावयास आला होता.या पॉईंटला सुरक्षा कठडा असूनही हे चौहान दाम्पत्य काठड्या बाहेर सेल्फी काढत होते पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत होते.आणि वाऱ्याच्या झोकात सरिता आणि राममहेश दोघे सेल्फी काढत असताना महिला 600 फूट खोल दरीत कोसळली.पोलीस त्वरित घटना स्थळी पोहोचले असून माथेरान मधील सहयाद्री रेस्क्यू टीम व हशाची पट्टी येथील आदिवासी या महिलेचा रात्री उशिरा पर्यंत शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत