माथेरानच्या राणीचा प्रवास होणार आता गारेगार

माथेरान : श्वेता शिंदे (प्रतिनिधी)

थंड हवेचे पर्यटनस्थळ असणाऱ्या माथेरानचा प्रवास देखील आता थंडगार होणार आहे. नेरळ माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनिट्रेनला वातानुकूलित डब्बा लावण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना माथेरानच्या थंड हवेबरोबर प्रवास देखील गारेगार झाला आहे.

माथेरानला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना उपलब्ध करून देण्यात येत आहे. रंगबेरंगी डब्यानंतर आता रेल्वेने नेरळ माथेरान दरम्यान धावणाऱ्या ट्रेनच्या प्रथम दर्जाच्या डब्बा वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आज वातानुकूलित करण्यात आलेला डब्बा लावून मिनिट्रेन नेरळवरून माथेरानकरिता रवाना झाली. यावेळी पर्यटकांनी निसर्गाच्या वातावरणासह डब्यातील थंड वातावरणाचा देखील अनुभव घेतला. या वातानुकूलित डब्यातून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 415 रुपये मोजावे लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत