माथेरानच्या हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती करणार!

खासदार श्रीरंग बारणे यांची माथेरानकरांना ग्वाही…

माथेरान : मुकुंद रांजाणे 

मागील पाच वर्षांपासून ई-रिक्षाचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. नुकताच राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. लवकरात लवकर इथे ई रिक्षा सुरू व्हावी आणि इथल्या हातरिक्षा ओढणाऱ्या श्रमिकांना या अमानवीय प्रथेच्या गुलामगिरी मधून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी. या हेतूने प्रेरित होऊन हात रिक्षा संघटनेचे सचिव तथा प्राध्यापक सुनील शिंदे यांनी शासनाकडे तगादा लावला आहे. आजवर त्यांनी सर्वच शासकीय कार्यालये पालथी घातलेली असून ई रिक्षाचे काम जलदगतीने होण्यासाठी सातत्याने पदरमोड करून पाठपुरावा करीत आहेत. याकामी श्रमिक रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची पनवेल येथील कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या ई-रिक्षा प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली.
माथेरानच्या बाबत मोठ्या प्रमाणावर कायदेशीर गुंतागुंत आहे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे त्यामुळे ई रिक्षाचा प्रस्ताव राज्य सरकारने केन्द्र सरकार कडे सादर केल्याने  निश्चित प्रश्न  मार्गी लावणार असल्याची ग्वाही खा.बारणे यांनी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सचिव सुनिल शिंदे उपाध्यक्ष प्रकाश सुतार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकूंद रांजाणे व युवा कार्यकर्ते चैतन्य शिंदे यांना दिली. खा.बारणे यांच्या कार्यपद्धतीचे कौशल्य पाहता रिक्षा चालकांना ई-रिक्षा द्वारे सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळेल.माथेरानची मिनी ट्रेन सुरू करण्यात खा.बारणे यांचा सिंहाचा वाटा आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्रेन कायम स्वरूपी बंद करण्याचा कुटील डाव आखला होता तेव्हा खा बारणे यांनी  तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांना या हेरिटेज ट्रेन चे महत्व समजून सांगितले त्या नंतर प्रभू यांनी ट्रेन सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर ट्रेनसेवा सुरू करण्यात आली आहे.
२०१४ मध्ये लोकसभेतील माझ्या पहिल्याच भाषणात मावळ मतदार संघाचे विविध प्रश्न मांडताना माथेरानच्या हातरिक्षा चालकांच्या शोषणाचा मुद्दा देखील तळमळीने उपस्थित केला होता.तेव्हा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरण पोषक ई-रिक्षा हा योग्य पर्याय उपलब्ध असल्याचे नमूद केले होते.मी जेव्हा जेव्हा माथेरानला येतो तेव्हा या हातरिक्षा पाहून मन व्यथित होते महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत पर्यटनस्थळ आहे दुर्दैवाने अशी अमानवीय प्रथा अद्याप माथेरानला अस्तित्वात आहे ही खेदजनक बाब आहे 
 खा.श्रीरंग आप्पा बारणे- मावळ मतदार संघ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत