माथेरानमध्ये अहिल्याबाई होळकर जयंती साजरी !

माथेरान  : मुकुंद रांजाणे

माथेरामध्ये धनगर समाजाला एक वेगळी दिशा प्राप्त होण्यासाठी स्वयंभू याच समाजाने माथेरामध्ये स्वकर्तुत्वाने आपला समाजविकास केलेला आहे. शिवकाळापासून ह्या समाजाचे मोठे योगदान लाभलेले आहे. सध्याच्या युगात शैक्षणिक प्रगती केल्याशिवाय आपण कदापि पुढे जाऊ शकत नाही यासाठी शिक्षणाला अधिकाधिक प्राधान्य दिले पाहिजे असे मत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९३ व्या जयंती निमित्त ते बोलत होते.
येथील इंदिरा गांधी नगर येथील धनगर समाज मंदिर येथे आयोजित केलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खेडकर यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले.प्रारंभी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, बांधकाम सभापती रुपाली आखाडे, माजी नगरसेवक राजेश दळवी, यांसह धनगर समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राकेश कोकळे,कार्याध्यक्ष तुकाराम आखाडे,उपाध्यक्ष शैलेश ढेबे, कोषाध्यक्ष मारुती कोकळे, जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र ढेबे,राम ढेबे, भगीरथ ढेबे, संतोष आखाडे,जानु ढेबे, यांसह अन्य समाजबांधव उपस्थित होते. देशसेवेसाठी अनेक कामे पूर्ण केल्यामुळे आज अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा जयजयकार होत आहे.समाजमंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी खेडकर यांनी दिले.नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुद्धा-अहिल्याबाई यांच्या जीवनावरील काही प्रसंग यानिमित्ताने कथन केले. तसेच अध्यक्ष राकेश कोकळे यांच्या सुचनेनुसार येथील टपाल पेटी नाक्याला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव लवकरच देण्यात येईल अशी ग्वाही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली. यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तर पत्रकारिता क्षेत्रांत भरीव योगदान देण्याबद्दल पत्रकार मुकुंद रांजाणे ,दत्ता शिंदे, चंद्रकांत सुतार यांचाही यथेच्छ सत्कार यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत