माथेरानमध्ये गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश !

माथेरान : मुकुंद रांजाणे 

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माथेरान नगर परिषदेच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि मुख्याधीकारी यांनी अश्वफेरी काढून समस्त जनतेला स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सकाळी नऊ वाजता नगर परिषद कार्यालयातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, गटनेते प्रसाद सावंत, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांसह काही आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रामुख्याने सहभागी होऊन स्वच्छता बाबतीत श्रीराम चौकात एकांकिका सादर केली. हुतात्मा स्मारक येथे सर्वच राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तसेच अश्वपाल, नागरिक यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छता बाबतीत दिलेली शपथ ग्रहण केली. यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नारायण सोनावणे यांनी माथेरानचे भूमिपुत्र हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनपटावर छोटेखानी शब्दांत आपल्या अनमोल भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सुद्धा स्वच्छता बाबतीत आपले विचार प्रकट केले. त्यांनतर दस्तुरी नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मृती स्तंभास उप नगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केला.
नगर परिषद प्राथमिक शाळेतील मॉड्युलर टॉयलेट, वॉटर कुलर, संरक्षण ग्रीलचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिक्षण सभापती राकेश चौधरी, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रदीप घावरे,नगरसेवक,नगरसेविका मुख्याध्यापक दिलीप अहिरे,शिक्षक वृंद तसेच नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत